ब्लॉग व्हिझिटर्सच्या आभार प्रदर्शनाची फॉरमॅलिटी मी इथे करणार नाही, कारण हा ब्लॉग माझ्या फोटोग्राफिच्या स्किल्स् दाखवण्याकरिता नाहीच आहे मुळी! (स्किल्स् नाहीच आहे तर दाखवणार कुठून?)
हा ब्लॉग आणि माझी फोटोग्राफि एकाच दिवशी सुरु झाली. ह्या वरुन तुम्हाला कळालं असेलच, मी किती फ्रेश फोटोग्राफर आहे ते. खरंतर कॅमेरा हातात घ्यायचंच टेन्शन यायचं, नीट जमेल का? आपल्याकडून बिघडणार तर नाही ना? पण पहिला फोटो "क्लिक्" केला आणि त्या क्षणाला मनातली सगळी फ्रस्ट्रेशन्स गायब झाली.
आपल्या सभोवतालच्या रोजच्याच जगाकडे बघायची एक वेगळी दृष्टी दिली ह्या कॅमेरा व्हयु-फाईंडरने किंवा असं म्हणा हवं तर की ह्या एका "क्लिक्" बरोबर एका नवीनंच जगाची शटर्स ओपन झाली माझ्यासाठी!
खरचं जीवन किती असंख्य छोट्या छोट्या पण कमालीच्या सुंदर, मजेशीर तर कधी अंर्त:मुख करायला लावणा-या विलक्षण गोष्टींनी भरलेले आहे. ते तसेच होते, आपण मात्र आपल्या धावपळ, दगदग, चिंतांच ओझं वाहतानां ह्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचाच विसरुन गेलो होतो.
हा आनंद तुम्हा सगळ्यांबरोबर वाटून घेण्यासाठीचं हा ब्लॉग!!!
2 comments:
mast ahe, shengdaane udvat nahi ka?
Nice shot! :)
Post a Comment